“मुळं ज्यांच्या हातात असतात त्यांचा पराभव अशक्य आहे. तेव्हा बुथ कमिट्या मजबूत करा. प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीही राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर उभे राहिले तरी आपण ती जागा जिंकू शकतो. गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा आणि आपल्या विचारांचा उद्याचा महाराष्ट्र कसा असणार याची संकल्पना लोकांना सांगा.
लोकांचे जी कामे असतील ती करून द्या, सरकार आपल्या विचारांचे आहे. सरकार दरबारी लोकांच्या कामाचा पाठपुरावा करा. २०२४ ला तिरोडा विधानसभा राष्ट्रवादीच जिंकणार”, असा सूर प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी तिरोडा विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या सभेत लावला.
तिरोडा येथील बैठकीला जिल्हाध्यक्ष माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार, माजी आमदार राजू जैन, माजी आमदार प्रकाश गजभिये विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, पक्षाचे नेते धनंजय दलाल, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.