‘डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत’ : आशिष शेलार

9

कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

बंदच्या मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!,” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?

माझ्या शेतकरी बांधवानो,
तुम्ही आठवा थोडे मागचे,
मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत
डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!
असे ट्विट करत शेलार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली.