राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील भाजपने काय केले, याची माहिती घ्यावी, बालिशपणे बोलू नये : भाजप

54

नाशिकला रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन भाजपच्या आंदोलनामुळेच मिळाला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनचा तुटवडा नसून खासगी हॉस्पिटलमध्ये या दोन्ही गोष्टींचा तुटवडा आहे.

त्यामुळे ज्यांचे मुख्यमंत्री घरात बसून आहेत, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील भाजपने काय केले, याबाबत माहिती घ्यावी, बालिशपणे बोलू नये, असा सल्ला भाजपतर्फे देण्यात आला.

महापालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे व भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी संयुक्त पत्रक काढून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावर टीका करणारे शिवसेना नेते अजय बोरस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यावर पलटवार केला.