काही दिवसांअगोदर पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रीटा थनबर्ग आणि मीना हॅरीस यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. यानंतर या सेलीब्रीटींच्या ट्वीटला पाठींबा मिळत संपूर जगभरातून शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट करण्यात येत होते. या पार्श्वभूमिवरच आपल्या देशातील काही खेळाडू आणि कलाकारांनी पुढाकार घेत परदेशी सेलीब्रीटींच्या ट्वीटला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. #indiatogether हा हॅशटॅग भारतात चालवण्यात आल. परराष्ट्र मंत्रालयासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या हॅशटॅगखाली ट्वीट केले आणि त्यावरुन भारतात चांगलेच वातवरण तापले होते.
विरोधी पक्षातील नेत्यांनी भारतीय सेलीब्रीटींनी दिलेल्या ऊत्तरांवर टीका केली. मात्र भाजपचे नेते या सेलीब्रीटींच्या पाठीशी होते. तसेच सरकारमधील अनेक नेत्यांनी या परदेशी कलाकारांवर टीकासुद्धा केली होती. अखेर पंतप्रधानांनीसुद्धा या परदेशी कलाकारांना सुनावले आहे. “भारताची लोकशाही ही पाश्चिमात्य संस्था नाही, तर एक मानवी संस्था” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आज राज्यसभेत ते बोलत होते.
परदेशी सेलीब्रीटींना ऊत्तरे देतांना सर्वांचा सुर भारत एक सार्वभौमत्व राष्ट्र यावर होता. पंतप्रधान मोदींनीसुद्धा हाच धागा पकडत परदेशी सेलीब्रीटींना सुनावले आहे. सोबतच भारतीय लोकशाहीचे महत्व पटवून देत त्यांनी काही ऊदाहरणंसुद्धा दिली आहेत.
पंतप्रधान यावेळी म्हणाले “भारताचा इतिहास लोकशाही संस्थांनी भरलेला आहे. प्राचीन भारतात ८१ गणराज्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो. तसेच भारताचा राष्ट्रवाद हा संकीर्ण, स्वार्थी आणि आक्रमकही नाही. हा सत्यम शिवम सुंदरमंच्या मुल्यांनी प्रेरित आहे” असं नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं आहे, असेसुद्धा मोदी यावेळी म्हणाले.
मी विशेषता युवकांना याठिकाणी आग्रहाने सांगू ईंच्छितो की भारत हे केवळ लोकशाही राष्ट्रच नाही तर लोकशाही विचारांची मातृभूमी आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी शेतकरी आंदोलनासंदर्भातील बाजू सांभाळण्याचासुद्धा प्रयत्न केला. भारताच्या जडणघडणीतील शीखांचे योगदान त्यांनी यावेळी सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. “शीख समाजाचा मला अभिमान वाटतो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यातील काही काळ पंजाबमध्ये काढला आहे.” असेदेखील मोदी यावेळी म्हणाले.