ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी; ते जिन्नांची भाषा बोलतात : भाजप खासदार

61

भाजपा नेते, खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोमवारी एमआयएम आणि ओवेसी यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम विरुद्ध भाजपा अशी सरळ लढत पहायला मिळते आहे. एक डिसेंबर रोजी हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या आधीच भाजपाच्या सूर्या यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि त्यांच्या भावावर निशाणा साधला आहे. सूर्या यांनी ‘असदुद्दीन आणि अकबरुद्दीन हे विकासाबद्दल बोलत आहेत हे खूपच हस्यास्पद आहे,’ असं म्हटलंय. भाजपाने या निवडणुकींसाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे.

“ओवेसी कधीही जुन्या हैदराबादचा विकास करणार नाहीत. केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणार मत असेल असं वक्तव्य सूर्या यांनी केलंय. असदुद्दीने ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात याच गोष्टी मोहम्मद अली जिन्नाही करायचे,” अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर निशाणा साधला आहे.

हैदराबाद महापालिका निवडणूक एक डिसेंबरला होत आहे. तर निवडणुकीचा निकाल ४ डिसेंबर रोजी लागणार आहे. भाजप, एमआयएम, आणि टीएमसी या तीन पक्षात जोरदार लढत होईल. हैदराबाद महापालिका कोणाच्या ताब्यात जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.