सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण उपक्रम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलेला आहे. मात्र JNU च्या माजी प्राध्यपकाने लस घेण्यास नकार दिला आहे. त्या प्राध्यापकाने दिलेले उत्तर अतिशय धक्कादायक आहे. मोदींचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असल्याने आपण लस घेतली नाही असं चमनलाल यांनी सांगितले आहे. कोरोनाची लस घेतलेल्या प्रमाणपत्रावर एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणं अपेक्षित आहे, असंही चमनलाल म्हणालेत.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो जबरदस्तीने या प्रमाणपत्रावर लावण्यात आल्याचा आरोप माजी प्राध्यापक चमनलाल यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्रही लिहिलं आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असण्यावरुन वाद निर्माण झाला होता. आता त्यापाठोपाठ पंजाबमधील एका प्राध्यापकाने लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा नाहीतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा अशी मागणी केली आहे.
या संदर्भात एका प्रसिद्ध वृत्तसमूहाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून निवृत्त झालेल्या प्राध्यापक चमनलाल यांनी मोदींच्या फोटोमुळे लस टोचून घेण्यास नकार दिलाय. मोदींचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असल्याने आपण लस घेतली नाहीय असं चमनलाल सांगतात. कोरोनाची लस घेतलेल्या प्रमाणपत्रावर एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणं अपेक्षित आहे, असंही चमनलाल म्हणालेत. ७४ वर्षीय चमनलाल यांनी आपण लसीकरणास पात्र असून पंजाबमधील वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण करणं गरजेचं असल्याचं मान्य केलं असलं तरी या ‘खासगी आणि सामाजिक विरोधामुळे’ लस घेत नसल्याचं म्हटलं आहे.