‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील हे फेमस पात्र होणार एक्झिट

22

छोट्या पडद्यावरील अतिशय सुपरहिट मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका नेहमी चर्चेत असते. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. या मालिकेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

या मालिकेतील सर्वांची लाडकी शनाया ही भूमिका रसिका सुनील साकारत आहे. ती आता कायमचीच मालिका सोडण्याचे वृत्त समोर येत आहे. सध्या ती रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या कारणामुळे शनाया मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारलं होतं. तिच्या भूमिका आणि स्टाईलने चाहत्यांना भुरळ घातली होती. मालिकेच्या मध्यात शनायाची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेतील शनाया हे पात्रच एक्झिट होणार असल्याचं समजत आहे.