जिलेटीन कांड्या बेकायदेशिर देणारा व बाळगल्याबद्दल आणि झालेले स्फोट व त्यातील नुकसानीबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी फिर्यादी कालीदास संपत झेंडे (रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) यांनी याबाबत सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
झेंडेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत जुन्या जेजुरी मार्गालगत आरटीअो कार्याजवळील झेंडेमळ्यात मल्हारवाडा हाॅटेल परीसरात काल दुपारी तीनच्या सुमारास जिलेटिन कांड्यांचा स्फोट होण्याची घटना घडली. त्यात दोन हाॅटेलसह एकाच्या वाहनाचे नुकसान झाले.
या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून गणेश जयसिंग सरक (रा. मिरगाव, ता. फलटण, जि. सातारा) व खाडे (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध काल रात्री साडेअकरा वाजता गुन्हा दाखल झाला आहे. दोघांपैकी सरक या आरोपीस अटकही केली आहे.,अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व सहायक निरीक्षक राहुल घुगे यांनी आज दिली.
स्फोटाने लगतच्या मल्हारवाडा हाॅटेलचे व शिवाजी विश्वास कटके यांच्या मारुती इको कारचे (एमएच 12 टीएच 0812) हीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मनुष्यहानी झाली नाही. येथून काही अंतरावर असलेल्या दुसरे एक सवाई हाॅटेलच्या भिंतीनाही आतून तडे गेले., त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते.