राज्यपालांना सरकारी विमान नाकारल्याचा फडणवीसांचा दावा, त्यावर राऊंताचे प्रत्युत्तर

16

राज्यातील महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यात गत काही दिवसांपासून प्रचंड शाब्दिक वाद सुरु आहे. यामध्येच भर घालणार प्रसंग घडला आहे.
राज्यपल भगतसिंह कोश्यारी डेहराडून या त्यांच्या गृहराज्यात परत जात असतांना त्यांना सरकारी विमानाने न जाता खाजगी विमानाने जावे लागले आहे. यावरुन भाजपने राज्य सरकारवर निशाना साधण्यास सुरुवात केली. तर तिकडे नेहमिप्रमाणे राज्य सरकारचा बचाव करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत पुढे सरसावले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाणिवपुर्वक सरकारी विमानातून प्रवास करु दिला गेला नाही. राज्यपालांना खाजगी कामासाठी सरकारी विमान वापरायचे असल्यास पुर्वपरवानगी घ्यावी लागते. परंतू राज्यपाल विमानात चढेपर्यंत राज्य सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. जाणिवपुर्वक त्यांना परवानगी नाकारण्यात आली असून विमानातून खाली ऊतरवण्याचा प्रकार सरकारने केला आहे. जो अत्यंत दुर्दैवी आहे. एवढे अहंकारी सरकार मी याअगोदर कधीच बघितले नाही. अशा शब्दात फडणवीस महाविकासआघाडी सरकारवर संतापले आहेत.

यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत भाजपवर टीका केली आहे. “

राज्यपाल जेव्हा वैयक्तिक कामासाठी आपल्या राज्यात जातात तेव्हा विमान वापरण्यासंदर्भात गृहखात्याचे काही निर्देश आहेत. त्या निर्देशांचं पालन राज्य सरकारने केलं आहे. यामागे आमचा कुठलाही विशुद्ध हेतू नव्हता. याअगोदर

जेव्हा जेव्हा राज्यपालांना सरकारी कामासाठी कोणतंही हेलिकॉप्टर, विमान हवं असेल तेव्हा ते सरकारने उपलब्ध करुन दिलं आहे. त्यामुळे यामागे आमचा कुठलाही विशुद्ध हेतू नव्हता.

” असे संजय राऊत यावेळी म्हणाले. अहंकारी सरकार यावरुन त्यांनी फडणवीसांना ऊत्तर दिले आहे.

“अरे बापरे…कोण कोणास म्हणाले ? असा प्रश्न असायचा. येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो. नियम पाळणं अहंकार आहे का? ज्याप्रकारे कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकार वागत आहे तो अहंकार नाही आणि नियमांचं पालन आहे तर मग राज्यपालांना नियमानुसार विमान मिळालं नाही हा अहंकार कसा असू शकतो?”. एका खाजगी वृत्तवाहिनीशीनते बोलत होते.

राज्यपाल आणि महाविकासआघाडी यांच्यात कायमच तण-तण होत असते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनहे संघविचाराचे आहेत. त्यामुळे ते अप्रत्यक्षरित्या भाजपचे हस्तक असल्यासारखे काम करतात असा आरोप महाविकासआघाडीतील नेत्यांकडून कायमच होत असतो. विधानपरिषदेच्या १२ जागांवरुनसुद्धा राज्यपाल विरुद्ध सरकार असं चित्र आहे. यावर अजित पवार आणि कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यायालयात जाऊ असा ईशारासुद्धा दिला आहे.