“फडणवीस साहेब हे करुन दाखवा…. आप्पा दातार चौकात तुमचा भव्य सत्कार करेन” शिवसैनिकाने दिले फडणवीसांना हे चॅलेंज

76

महाराष्ट्रात वाढती कोरोनाची रुग्णसंख्येवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात. मात्र नागपुरमधील कोरोना परिस्थितीकडे लक्ष वेधत डोंबिवलीतील शिवसैनिक तसेच माजी परिवहन सभापती राजेश कदम यांनी फडणवीस‍ांना चॅलेंज केले आहे. तसेच फडणवीसांनी हे करुन दाखवले तर डोंबिवलीतील आप्पा दातार चौकात म्हणजेच फडके पथावर भव्य सत्कार ठेवेन असे म्हणत फडणवीसांना चॅलेंज केले आहे.

महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येवरुन भाजपमधील नेतेमंडळी कायम मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात. परंतू नागपूरमधील कोरोना परिस्थितीकडे राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष द्यावे. तसेच आपल्या पक्षातील तज्ज्ञ व्यक्तींना सोबत घेत नागपुरात फडणवीस पॅटर्न राबवावा आणि रुग्णसंख्या कमी करुन दाखवावी.

भाजपमधील प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या, छोटे-मोठे सर्व राणे, गोपीचंड पडळकर, अतुल भातखळकर आणि ईतरही पक्षातील तज्ज्ञांना सोबत घेऊन नागपुरमध्ये फडणवीस पॅटर्न राबवावा. काहीही बंद न करता, लॉकडाऊन न करता रुग्णसंख्या आटोक्यात आणून दाखवावी. असे केल्यास डोंबिवलीतील आप्पा दातार चौकात आपला भव्य सत्कार करेन असेसुद्धा राजेश कदम म्हणाले आहेत.

राजेश कदमांच्या या ऊपरोधक टीकेची सर्वत्र चर्चा होते आहे. भाजपकडून मात्र अद्याप यांस काहीही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.