कालच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका केली होती. सर्व केंद्राने करायचं मग राज्याने काय माशा मारायच्या का? असे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय? माशा मारण्याचा आनंद घ्या, अशी जहरी खोचक टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.
फडणवीस यांनी केलेल्या टीकेला त्यांच्याच शब्दात मलिक यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाकडून माशा मारण्याच्या स्पर्धाही भरवा!, असा सल्ला त्यांनी ट्विट करत दिला आहे.