कांद्याच्या दारात पुन्हा घसरण

5

आज लोणंद(जि. सातारा) कृषि उत्पन्न बाजार समितीत गारवा कांद्याच्या लिलावात आठवड्यात सतराशे रुपये प्रति क्विंटलची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाच्या विळख्यातून वाचलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल सात ते आठ हजार रुपये भाव मिळु लागला होता. परंतु आत्ता उच्च प्रतीच्या कांद्यामध्ये चार दिवसात आठशे ते आठ दिवसांत सतराशे रुपये प्रतिक्विंटलने घट झाल्याचे दिसून आले आहे.

कृषी विधेयकातील तरतुदींविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ठाण मांडले असतानाच कांद्याच्या दारात पुन्हा घसरण झाली असल्याने विधेयकातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. आज लोणंद(जि. सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीत गारवा कांद्याच्या लिलावाला १००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल तर हळवी कांद्याला १००० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून एकीकडे कांदा वगळला. पण दुसरीकडे सन १९९२ चा विदेशी व्यापार कायद्यांनवे १४ सप्टेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लादली. जीवनावश्यक वस्तू कायद्यातून कांदा वगळताना असाधारण परिस्थितीत सरकार पुन्हा नियंत्रण आणू शकतो. या घातलेल्या छुप्या तरतुदीचा या निर्बंधांसाठी वापर केला गेला.

२३ नोव्हेंबरला हे दर १००० ते ५७०० आणि १००० ते ४२०० असे होते. २६ नोव्हेंबरला १००० ते ४८०० आणि १००० ते ४७०० असे होते. दर घटनेत म्हणून १४ ऑक्टोबरला साठवणुकीवर निर्बंध घालत आयातीची बंधने शिथिल केली. या निर्बंधबंदी व निर्बंधांचे परिणाम आत्ता तीव्रतेने जाणवत आहेत. परराज्यातुन कांद्याची आवक व आयात आणि निर्बंधीच्या रूपाने झालेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे कांद्याचे भाव पुन्हा गडाडले आहेत.