प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला रेल्वेत नोकरी द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात खासदार पाटील यांनी मागणी केली.
पुणे-मिरज-लोंढा लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, त्यापैकी सुमारे 100 किलोमीटरचा लोहमार्ग सातारा लोकसभा मतदारसंघातून जातो.असे खासदार पाटील म्हणाले.
प्रकल्पासाठी संपादित जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या निधीचा अर्थसंकल्पात समावेश होणे जरुरी आहे. विस्तारीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पाच्या कागदोपत्री नोंदी व प्रत्यक्षात असणाऱ्या जमिनींत मोठ्या प्रमाणावर विसंगती आहे.
विस्तारीकरण प्रकल्पाच्या कामासाठी खासगी कंपनीने सर्व्हे केलेला असून, त्यांच्या व भूमिअभिलेखच्या रेकॉर्डमध्ये तफावत आहे. त्यामुळे लोहमार्गाच्या दुतर्फा असलेले प्रकल्पग्रस्त मिळणाऱ्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.