कोरोना प्रतिबंधात्नक लसीकरणावरुनसुद्धा आता राजकारणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात लसीकरण प्रभावीपणे होत नसल्याचे केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले. तसेच राज्यात आतपर्यंत केवळ ४४ टक्केच डोस वापरण्यात आले असल्याचेसुद्धा त्यांनी यावेळी म्हटले. यावरुनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी प्रकाश जावडेकरांना लक्ष्य करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
एखाद्या राज्याला लसीचे डोस मिळाल्यास ते परस्पर वितरीत करण्याचा अथवा मनाप्रमाणे त्याचा वापर करण्याचा अधिकार नसतो. तज्ज्ञ गटाने ठरवुन दिलेल्या नियोजनानुसार त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे कुठल्याही माहितीचा आधार न घेता प्रकाश जावडेजर यांनी आपल्या मातृराज्यावर केलेली टीका निंदनीय आहे. असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
रोहित पवार यांनी लसीकरणाच्या बाबतीत काही मुद्देसुद्धा याठिकाणी ऊपस्थित केले. अनेकांमध्ये लसीबाबत साशंकता आहे. त्यामुळे लोक पुढे यात नाहीये. कोवीन या डिजीटल एपवर ग्रामीण ठिकाणांवरील नोदणी करण्यास अडथळे येत आहे. तरिदेखील राज्य सरकार पूर्ण क्षमतेनिशी लसीकरणावर भर देते आहे. लसीकरणाबाबत जनजागृती करते आहे.
पूर्ण माहिती न घेता एका जवाबदार केंद्रिय मंत्र्यांनी अशी वक्तव्ये करणे खरेतर दुर्दैव आहे. महाराष्ट्राची घनता प्रचंड आहे. तसेच महाराष्ट्र हे देशाचे ईंजीन आहे. त्यामुळे ते सुरु राहणे गरजेचे आहे. अशाप्रकारे एकांगी टीका न करता महाराष्ट्राची गरज अोळखून सरसकट लसीकरणासाठी केंद्राने महाराष्ट्राला डोस ऊपलब्ध करुन द्यावेत आणि यासाठी प्रकाश जावडेजर यांनी पाठपुरावा करावा असा टोलासुद्धा रोहित पवारंनाी यावेळी लगावला आहे.