चित्रपट ‘ओम शांती ओम’ मधून डेब्यु करणारी अभिनेत्री दिपीका पादुकोन ही नेहमी आपल्या अभिनयामुळे चाहत्यांची मने जिंकत आली आहे. तिला नुकतेच बॉलीवूडमध्ये पदार्पण करून 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. दिपीका सुशांतसिंह राजपूत प्रकरणात देखील खूप चर्चेत होती. आता ती तिच्या नवीन चित्रपटाच्या मानधनामुळे चर्चेत आली आहे. यशराज निर्मित ‘पठाण’ फिल्मसाठी दिपीकाने सुमारे 14-15 कोटी रुपये घेतले आहेत.
पठाण हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त महागडा अँक्शनपट असून याचं बजेट जवळपास 200 कोटींच आहे. दिपीका चित्रपटांसाठी भरपूर मानधन घेते. बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. पठाण चित्रपटात दिपीका पादुकोन आणि जॉन इब्राहिम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिपीका आपल्या वेगवेगळ्या लुकमुळे ओळखली जाते. चाहत्यांना आता तिच्या पठाण चित्रपटातील भूमिकेबद्दल उत्सुकता लागली आहे.