प्रसिद्ध कॉमेडियन मनीष पॉलला कोरोनाची लागण

16

देशात कोरोना व्हायरसने धूमासान घातलेले आहे. कलाविश्वातील लोकांना देखील याचा सामना करावा लागत आहे. प्रसिद्ध कॉमेडीयन मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मनीष पॉलला काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. अखेर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरून धवनचा आगामी सिनेमा ‘जुग जुग जियो’ च्या शूटिंग दरम्यान मनीषला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे.

मनीष ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. तो मुंबईला परतल्यानंतर त्याला काही लक्षणे आढळून आली त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सर्व स्टार कास्टला कोरोना झाल्याची बातमी देखील समोर आली होती. वरून धवन, नितु सिंह, अनिल कपूर आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते सर्व आयसोलेशन मध्ये आहेत.