मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदोरिकर यांचं वक्तव्य; म्हणाले…

39

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर ते आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेकजण समोर आले होते. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतरही त्यांच्या लोकप्रियतेत फरक पडलेला नाही.

आता महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचे सूतोवाच केले आहे.

Lधनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन समोट आले होते, यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज यांनी सदरील वक्तव्य केले

त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील अरोपांशी त्यांच्या समर्थकांना काहीही फरक पडलेला नाही. उलट नगर आणि बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत झालेलं पाहायला मिळालं.