‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतुन लोकप्रिय झालेला मराठीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला आहे. या मालिकेतील त्याची ‘श्री’ ही भूमिका खूप गाजली होती. शशांक मन बावरे या मालिकेत दिसला होता. या मालिकेतील सिध्दार्थची भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. त्यानंतर शशांक कोणत्या मालिकेत दिसणार याची प्रतिक्षा चाहत्यांना होती.
शशांक केतकर पुन्हा एकदा छोड्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. तो पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शशांक लवकरच झी मराठी वाहिनीवरील आगामी ‘पाहिले न मी तुला’ ह्या मालिकेतून एन्ट्री करत आहे. आता ह्या मालिकेत तो कुठल्या भूमिकेत असणार हे सरप्राईझ असणार आहे.
शशांक सोबत ह्या मालिकेत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत शशांकसोबत अभिनेता आशय कुलकर्णी स्क्रीन शेअर करणार आहे. तर तन्वी मुंडले ही नवोदित अभिनेत्री या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.