सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. त्यात मोठ्या संख्याने रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही देशभरात वाढलेले दिसून येत आहे. त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. झी न्यूजमध्ये अधिक काळ काम केलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये कार्यरत होते.
रोहित सरदाना यांच्या या निधमामुळे पत्रकार जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. झी न्यूजमध्ये वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या सुधीर चौधरींनी सरदाना यांच्या निधनाची माहिती ट्विट करून दिली. कोरोना विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती, असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच वाराशे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सुद्धा ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे,
‘थोड्याच वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझे हात थरथरू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदाना यांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. हा विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवानं केलेला अन्याय आहे. ओम शांती,’ असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.