प्रसिध्द गायक सरदूल मोहाली यांचे निधन

9

प्रसिध्द पंजाबी गायक सरदूल मोहाली यांचे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. गेल्या आठवड्यापूर्वी ते किडनीच्या विकारानं त्रस्त होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्वीट करुन श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी श्रध्दांजली वाहताना लिहिले आहे की, एक महान गायक आज आपल्यातून गेले आहेत. त्यांचे जाणे धक्कादायक आहे. त्यांची झुंज एकाकी ठरली. त्यांच्या जाण्यानं पंजाब संगीत विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

सरदूल सिकंदर यांना लहानपणापासून गाण्याचा छंद होता. 1980 च्या दशकात त्यांनी रोडवेज दी लारी नावाचा एक अल्बम काढला होता. त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. तसेच त्यांनी जग्गा डाकू नावाच्या एका पंजाबी चित्रपटातही काम केले होते. 

सिकंदर यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.