शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रश्न चर्चेने सोडवतील, त्यात इतरांनी नाक खुपसू नये:सनी देओल

18

आपण आपल्या सरकारबरोबर आहोत. शेतकऱ्यांबरोबर आहोत आणि कायम शेतकऱ्यांबरोबर राहू. शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या आडून आपले हेतू साधून घेण्याचा काही जणांचा डाव असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांनी केला आहे. तसेच शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रश्न चर्चेने सोडवतील त्यात इतरांनी नाक खुपसू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानचे समर्थन करताना कार्यकर्ता आणि अभिनेता दिप कॅमेरात कैद झाला आहे. दीप सिद्धू याच्याशी आणि त्याच्या कारवायांशी आपला काहीही संबंध नाही. निवडणुकीच्या काळात तो आपल्या सोबत होता. पण दीर्घकाळापासून तो आपल्या संपर्कात नाही. असेही सनी देओल याने स्पष्ट केले आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत आले आहे. इतरांनी त्यामध्ये पडून अडचणी वाढवू नयेत. असे करणाऱ्यांना वास्तविक शेतकऱ्यांशी काहीही घेणं देणं नाही. तर त्यांना त्यातून आपला स्वार्थ साधून घेयचा आहे. असे देओल यांनी ट्विट केले आहे.