अपेक्षित मागणी आणि भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. लग्नसमारंभात उपस्थितीवर निर्बंध तसेच उपाहारगृहे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम भाजीपाला विक्रीवर झाला आहे.
किरकोळ भाजीपाला विक्री दुकानांवर वेळेचे बंधन असल्याने खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे, ग्राहकांना भाजी स्वस्त मिळत असली, तरी निर्बंधांमुळे भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.
मार्केट यार्ड घाऊक भाजीपाला आणि गूळ-भुसार बाजार शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बंद आहे. अशा परिस्थितीत घाऊक बाजारात शेतमाल विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.