दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

13

शेतकरी आंदोलनाचा आज 38 वा दिवस आहे. सरकारने हे विधेयके रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी ठाम असून, कडाक्याच्या थंडीतही आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकरी संघटनांनी सांगितलं आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी देशाच्या राजधानीच्या सीमांवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. नववर्षात 4 जानेवारी रोजी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. अशातच शेतकरी संघटनांनी 4 जानेवारीपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान दिल्ली आंदोलनात सहभागी झालेल्या एक शेतकऱ्यांने शौचालयात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये 1 जानेवारी रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. यापुढील बैठक 4 जानेवारीला होणार असून, यात नक्कीच समाधानरित्या खर्चा होईल असे मत कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले आहे.