गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत कृषी कायद्याविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांच्या यावर अनेक चर्चा झाल्या, मात्र यावर एकमत होऊ शकलं नाही.माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांनी नवीन कृषी कायद्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घावी, असा सल्ला दिला आहे.
मध्य प्रदेशचे शेतकरी साधे-भोळे आहेत, मात्र काँग्रेस झोपी गेली आहे. जागे व्हा, आंदोलनात सामील व्हा आणि या कायद्यांविरोधात आवाज उठवा.’, असे ते म्हणाले आहेत.शेतकरी आंदोलनावरून दिग्विजय सिंह यांनी स्वपक्षालाच लक्ष्य केलं आहे.
एएनआय’ या वृत्तसंस्थेनुसार दिग्विजय सिंह म्हणाले की, ‘हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी कृषी कायद्यास विरोध करीत आहेत, कारण पत्रप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर अन्याय करत आहेत.अशी टीकाही त्यांनी केली.