राकेश टिकैत यांना पोलीस अधीक्षकाच्या नावाने फेक कॉल

7

राकेश टिकैत यांच्यासह राष्ट्रीय शेतकरी नेते आझाद मैदानावर 20 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता किसान महामेळाव्याला संबोधित करणार होते.

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीस मान देत टिकैत यांनी सभा रद्द केल्याची माहिती संदीप गिड्डे पाटील यांनी रात्री उशिरा दिली. तसेच यामागे फार मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही गिड्डे पाटील यांनी केला आहे.

गिड्डे पाटील यांनी सभा रद्द होण्याचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला. ते म्हणाले की, टिकैत यांची सभा रद्द होण्यामागे फार मोठे षडयंत्र आहे. त्यांना यवतमाळातून कोणीतरी एसएसपीच्या नावाने फोन केला. तसेच यवतमाळला आले तर 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येईल असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः टिकैत यांना फोन करून महाराष्ट्रातील आघाडी सरकार शेतकरी आंदोलनाच्या बाजूने असून राज्यात सध्या कोरोना वाढत असल्याने सभा रद्द करावी असे आवाहन केले.