शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत पैसा कमविण्याचा फंडा अनेक शेतकरी आजमावून पाहतात. काहींना फायदा होतो, तर काहींना शेतमाल तोट्यात विक्री करावा लागतो. असेच काहीसे चित्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या राज्यात आहे.
ऊत्पादनखर्चही निघत नसल्याने नाशिक येथील शेतकऱ्यांनी टरबूज रस्त्यावर फेकून दिली. ऐन उन्हाळ्यात टरबुजांची लाली उतरल्याने मरळगोई (ता. निफाड) शेतकरी हवालदिल झाला आहे.
उत्पादनखर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरीचा खर्चही निघत नसल्याने निफाड तालुक्यातील मरळगोई येथील एका शेतकऱ्याने टरबूज रस्त्याच्या कडेला फेकून दिले. या टरबुजांवर गायीनी मनसोक्त ताव मारला.