सुशांत राजपुतच्या भावावर जिवघेणा हल्ला

4

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी जिवघेणा हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ऊपचार सुरु आहे.

अभिनेता सुशात सिंह राजपुतच्या आत्महत्येने चांगलाच हडकंप ऊडाला होता. आत्महत्या की हत्या 

तसेच बॉलीवुडमधील घरणेशाहीवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सुशांत सिंह राजपुत प्रकरण थोडे क्षमते न क्षमते तो लगेच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंह मधेपूरा येथे मोटरसायकलचे शोरूम आहे. शोरुम उघडण्यासाठी ते गेले असता, पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला ओव्हर टेक करत त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. राजकुमाचर सिंह यांचा साथीदार अली हसनची परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.