बारामती :लॉकडाउनच्या संभाव्य भीतीने शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे. मोठ्या कष्टाने फुलविलेली फळबाग व पालेभाज्यांची कच्च्या-पक्क्या अवस्थेतील उत्पादने जिल्ह्यातील विविध बाजारपेठांत दाखल होत आहेत. अगदी कवडीमोलने ही उत्पादने विक्री होत आहेत.
लॉकडाउनच्या भीतीपोटी जिल्ह्याभरात लहान-मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि गावागावातील वर्दळीच्या जागी फळांची व भाज्यांची विक्री होत आहे. अल्पदरात उत्पादने मिळत असल्याने ग्राहक जास्तीच्या खरेदीसाठी सरसावल्याचे चित्र आहे. टरबूज, खरबूज, काकडी, द्राक्ष, चिंच, आवळा यांची अल्पदरात विक्री होत आहे.
पालेभाज्यांना लग्नसराईमुळे आणि उन्हामुळे रसदार फळांची मागणी लक्षात घेऊन पालेभाज्या व फळपिकांची लागवड करण्यात येते.कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याने उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. मेथी, मिरची, कोथिंबीर, शेवगा यासह विविध भाजीपाला उत्पादनांचे भाव कोसळले.