सात एप्रिल पासून खतांच्या किंमतीमध्ये वाढ

20

इफको कंपनीने खतांच्या किंमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताच्या ५० किलो बॅगला आता १९०० रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थ चक्राला मोठा दणका बसणार असून या दरवाढीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली त्यामुळे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केल्याचे बोलले जात आहे.

इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. खते महाग झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापराचे प्रमाण कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांची उत्पादने कमी होतील.

कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे सात एप्रिल पासून खतांच्या किंमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे.