क्रिकेटप्रेमींची संख्या आपल्याकडे प्रचंड आहे, या प्रेमातूनच क्रिकेटचे वेड असणारेसुद्धा अनेक आहेत, आणि या वेडातूनच क्रिकेटसंबंद्धी अनेक विचित्र घटना आपल्यासमोर येत असतात. अशीच एक मध्य प्रदेशच्या ग्वालीयर येथे घडली आहे.
एका क्रिकेट सामन्यादरम्यान हाफसेंच्यरीला एका रन बाकी असतांना फील्डरने कॅच घेत बॅट्समनला बाद केले. हाफसेंच्युरीला एक रन बाकी असतांनाच कॅच पकडली या रागातून बॅट्समनने त्याच बॅटने फील्डरला बेदम चोपले. यामध्ये कॅच पकडणारा फील्डर गंभीर जखमी झाला असून बॅट्समनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन पराशन असे कॅच धरणार्या खेळाडुचे नाव आहे, तर संजय पालीया असे मारहाण करणार्या बॅट्समनचे नाव आहे. सचिन पराशन याच्यावर सरकारी रुग्णालयात ऊपचार सुरु आहेत. संजय पालीयावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिनने कॅच धरल्यानंतर रागाच्या आवेशात येऊन संजयने सचिनला बॅटने मारण्यास सुरुवात केली. ईतर खेळाडूंनी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला. परंतू संजयने कुणालाच जुमानले नाही. दरम्यान सचिन बेशुद्ध झाला. २४ तासानंतर सचिन शुद्धिुवर आला असून तो आता धोक्याच्या बाहेर आहे. संजय या घटनेनंतर पसार झाला असून पोलिस त्याचा शोड घेत आहे.