राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असे एक खासदार म्हणताहेत. त्यांचा अभ्यास काय, असा प्रश्न उपस्थित करून भुजबळ म्हणाले, की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको ही मागणी आजही कायम आहे. मात्र काही लोकांचे ओबीसी आरक्षण काढण्यासाठी प्रयत्न चाललेत. त्यामुळे ओबीसींचे आंदोलन मराठा मोर्चांना उत्तर देण्यासाठी नव्हे, तर आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आहे.
दुसरीकडे आमच्यावर मराठा आरक्षणविरोधी म्हणून आरोप होत आहेत. शरद पवार यांच्याविषयी गैरसमज पसरवले जाताहेत, असे सांगून श्री. भुजबळ यांनी राज्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सरकार सबुरीने घेत आहे, असे स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पडद्याआडून भारतीय जनता पक्षाचे राजकारण सुरू आहे, असा हल्लाबोल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ११) येथे केला.कुणाचाही नामोल्लेख न करता त्यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करणारे खासदार भाजपचे असल्याची टीका केली आहे ते काल नाशिमध्ये पत्रकारांशी बोलत होते.