अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गाडीला धक्का लागला म्हणून एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ जानेवारीला हि घटना घडली. महेश मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून धक्का बसल्यावर मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली, अशी तक्रार कैलास सातपुते या व्यक्तीने केली आहे.
पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांकडे हि तक्रार दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर घडल्याची घडला आहे. महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन चापट मारली असे तक्रारदाराने म्हटले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील तक्रारदार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तक्रारदारने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून टेंभुर्णीकडे जात असातना एका गाडीने माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि पुढे जावून अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येणारी माझी गाडी त्यांच्या गाडीला धडकली. त्यानंतर पुढच्या गाडीतून महेश मांजरेकर आणि त्यांचे साथीदार खाली उतरले. नुकसान भरपाईची मागणी करु लागले. त्यादरम्यान, झालेल्या बाचाबाचीत त्यांनी शिवीगाळ आणि मारहणही केली.