इंदापूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार करतेवेळी “लोक सारख म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गंमत वाटते. सरकार पडलं तर बघू काय करायचं ते. हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे. भरलेलं भांड कधी आवाज करत नाही. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरही भाष्य केलं .नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत .त्यावेळी ते लसीच्या प्रगती संबंधी आढावा घेणार आहेत .देशाचे पंतप्रधान वेगळ्या विचारांचे असले तरी आपले पुणे त्यांना हवंहवंसं वाटतंय .असा टोलाही त्यांनी लगावला .आपल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आणि देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यातील ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल असं सुप्रिया म्हटलं सुळेनीं आहे.
आयुष्यभर सतेत राहण्यासाठी कोणीही आलेलं नाही .आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची ही वेळ येईल . पण ती लवकर येणार नाही. अस राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.