अखेर धवलसिंह मोहिते पाटलांनी धरला काँग्रेसचा हात

38

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अकलूज येथील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॅाग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार ही केला होता. 

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले धवलसिंह हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.