…अखेर धनंजय मुंडेंविरोधात ‘यांनी’ केली थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

349

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं आहे. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचीच माहिती दिली होती. दुसऱ्या महिलेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मी महाराष्ट्रातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.