मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. कोठे यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला असल्याने ही हकालपट्टी झाल्याचं बोललं जातंय.
महेश कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र महाविकास आघाडीत कुरबूर नको म्हणून त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं वृत्त होतं. त्यानंतर लगेचच कोठे यांची हकालपट्टी केल्याची माहिती पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. त्यामुळे आता कोठे यांची परिस्थिती ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे असं वाटत असतानाच…
दरम्यान, त्यानंतर महेश कोठे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे खुद्द शरद पवारांनीच ट्विट करत महेश कोठेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती दिलीय. महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.