मुंबई : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला . मात्र दुसरीकडे आघाडीचे नेते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निक्कालव्हर भाष्य करताना दिसून आले होते. याच मुद्द्यावरून आता भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी चाहते महाविकास आघाडी सरकारवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे.
आपल्या पहिल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग? असा सवालही निलेश राणे यांनी केला.
पुढे आंखूची एक ट्विट करून ते म्हणतात की, ममता बॅनर्जी जिंकल्या खऱ्या पण कशा जिंकल्या हे विसरून चालणार नाही. कृष्णकथा आणि चंडीपाठ व्यासपिठावर त्यांना म्हणावे लागले. ममतादीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला. लेफ्ट वाल्यांशी किंवा काँग्रेसशी लढताना त्यांना कधीही हिंदू आठवला नव्हता, तो पहिल्यांदा आठवला. हे काय कमी आहे.असे ट्विट त्यांनी केले होते.