तांडव वेबसिरीज विरोधात FIR दाखल

14

अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ही वेब सीरिज पाहिल्यानंतर ज्या कुणी आक्षेप घेतला आहे, त्या सर्वांची माफी मागत असल्याचं जफर यांनी म्हटलं आहे. तांडव रिलीज झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून होतो. या सीरिजवरून आमची माहिती आणि प्रसारण मंत्रालायशी चर्चा झाली. त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सीरिजमुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे अनेक केसेस दाखल झाल्याचं आम्हाला सांगितलं.

आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.गौतम बुद्ध नगरातील रबुपुरा पोलिस स्टेशनमध्ये निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.