उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यानंतर त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. उर्मिला यांनी ट्वीट करत त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट अज्ञात व्यक्तीनं हॅक केल्याची माहिती दिली होती.
इन्स्टाग्राम अकाउंट हॅक प्रकरणी उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध FIR दाखल केली आहे.दरम्यान त्यांच्या पतीला पाकिस्तानी, दहशतवादी म्हटलं गेल्यानं उर्मिला मातोंडकर गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सवर चांगल्याच फडकल्या होत्या. यावरून त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहे.
उर्मिला यांनी डीसीपी रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. त्यांना सगळ्या प्रकाराची माहिती दिली आहे. उर्मिला यांच्या तक्रारीची सायबर सेलनं गंभीर दखल घेतली असून FIR दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.