गेल्या आठवड्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले असता, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश सोनवणे व गटनेते जगदीश पाटील यांनी विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची परवानगी मागितली. त्यावर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आधी श्वेतपत्रिका काढा, त्यानंतरच कर्ज घेऊन महापालिका गहाण ठेवण्याचे धाडस करा’, असे थेट आव्हान केले.
महामेट्रोचा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. केंद्रानेच अद्यापही प्रकल्प मंजूर केलेला नाही. ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ ही भाजपची कायम भूमिका राहिली आहे. शिवसेनेने मेट्रो प्रकल्प कुठे अडविला, याचे पुरावे द्यावेत. नंतरच आरोप करावेत, असे आव्हान श्री. बोरस्ते यांनी दिले.
विकासकामे करायची असतील, तर पैसा लागेल. मात्र, महापालिकेकडे निधी नसल्याने विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढले जात असल्याचे समर्थन सत्ताधारी भाजपकडून केले जात आहे शिवसेनेला विकासकामांसाठी निधी नको असेल, तर तसे पत्र सदस्यांनी द्यावे, असे महापौर कुलकर्णी यांनी म्हटले होते. त्यावर बोरस्ते यांनी महापालिका भाजपची प्रॉपर्टी नसल्याचे उत्तर दिले.