राज्यातील लसीकरणाची पूर्ण तयारी झाली असून, आता फक्त केंद्र ,सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलतं असताना सांगितलं.मुंबईतील केईएम रुग्णालयात राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग केला जाणार असल्याची महत्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनावरील लस देताना कोणाला पहिले प्राधान्य दिले जाणार, तसेच लसीकरण कशा पद्धतीने केले जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने करण्याची गरज आहे.
तसेच महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट अदर पूनावाला यांनी देखील दिले होते. तेआम्ही पूर्ण केलं असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हणाले.कोरोना साथीच्या रोगाचा कायमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्व नागरीक कोरोनावरील लसीची प्रतीक्षा करतं आहेत.