राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं आहे.
या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर यासर्व प्रकरणाची युजर चघळण करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
यावर राष्ट्रवादी पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एखादी तक्रार झाली तर चौकशी होतच असते. जी व्यक्ती आरोप करत आहे ती त्यांची नातेवाईक आहे. करुणा शर्मांच्या बहिणीशी धनंजय मुंडेंनी लग्न केलेलं आहे, दोन मुलंसुद्धा आहेत. याच्या मागे काय कारण आहे ते आता मुंडे साहेबच सांगू शकतील. चौकशीत सगळं समोर येईल. आणि त्याची जी बाजू आहे ती निश्चित प्रकारे ते मांडतील. एखाद्या महिलेसोबत त्यांचं लग्न आधी झालेलं आहे, त्यांची मुलं आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकत होत्या. कोर्टाकडून काही तरी आदेश आणला. आता त्यांच्या बहिणी समोर येत आहेत. चौकशीनंतरच काय ते समोर येईल, त्यावर फार काही बोलू शकणार नाही, असं राष्ट्रवादी पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.