महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होते आहे. परिणामी महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा त्याबाबतचा ईशारा दिला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने लॉकडाऊनच्या विरोधातली भूमिका घेतली आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये लॉकडाऊन लावण्यावरुन मतप्रवाह आहेत. कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हान आणि भाई जगताप यांनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब, लघु व मध्यम ऊद्योजक, वचयवसायिकांना त्रास सहन करावा लागतो. गरीब जनतेचे हाल होतात. त्यामुळे लॉकडाऊन न लावण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससुद्धा लॉकडाऊन न लावण्याच्या बाजूनेच आहे.
आज लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. त्यानंतर रात्री ८:३० वाजता ते जनतेस संबोधीत करणार आहे. यामध्ये लॉकडाऊन, निर्बंध यांविषयीच्या बाबी ते स्पष्ट करणार आहेत.
लॉकडाऊन न करता निर्बंध कठोर करण्यावरच सर्वांचा भर आहे. दरम्यान आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्था अधिक सुसज्ज करण्यासाठी लॉकडाऊन केला जाऊ शकतो. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर म्हणाल्या आहेत.