कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन मान्सूनपूर्व कामं लवकर पूर्ण करा – जिल्हाधिकारी

14

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन मान्सूनसाठी तयारी करून यंत्रणांनी निर्धारित वेळेत कामाचे नियोजन पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाहीसह सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सर्व यंत्रणा प्रमुखांना दिले.

नेसर्गिक आपत्ती, अडचणी, धोके, लक्षात येताच तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास वेळोवेळी कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित आपत्ती वेळीच रोखली जाईल.
तलावांच्या सर्वेक्षणासह त्यांची गळती बाबत तपासणी करुन तात्काळ अहवाल सादर करावा. या तलावांची दुरूस्ती व पुर परिस्थितीचे नियोजन करावे. अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या.

संभाव्य धोक्यांच्या ठिकाणी नागरिकांना माहिती व सावध करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण सूचनांचे फलक लावावेत असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच पूर बचाव साहित्य अद्यावत ठेवून त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक यंत्रणांना माहिती असणे आवश्यक आहे.

पूर परिस्थिती उद्भवल्यास व गावांचा संपर्क तुटल्यास वीजपुरवठा, साथरोग नियंत्रणासाठी औषधसाठा, अन्नधान्याचा अतिरिक्त पुरवठा, जनावरांसाठी औषधसाठा, उपलब्ध 8 बोटी व त्यांचे प्रशिक्षित चालक या सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन करीत सतर्क राहण्याचीही सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणाप्रमुखांना केली.