भाजपच्या पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीही मैदानात ! महाविकासआघाडीच्या चिंतेत वाढ

42

महाविकासआघाडी सरकारचा सर्व बाजूंनी कोंडमारा होतो आहे. संजय राठोड प्रकरण महाविकासआघाडी सरकारला चांगलेच भोवले. आता परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बने तर महाविकासआघाडी सरकारवर हल्लाच चढवला आहे. भाजपने अनिल देशमुख यांच्या राजिनाम्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला. भाजपच्या पाठोपाठ मनसे आणि वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकार म्हणजे चोर, दरोडेखोर आणि खुन्यांचे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हे सरकार बरखास्त करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत असेसुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राजकारणातील आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन काय करु शकतात हे आपण पाहतो आहोत. थेट गृहमंत्री अशाप्रकारे वर्तन करतात हे निंदनीय आहे. आम्हाला २२ मार्च रोजीची वेळ राज्यपालांनी दिली आहे. आम्ही हे सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे करणार आहोत.

रिपाईचे अध्यक्ष रामादास आठवले यांनीसुद्धा ऊद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. ऊद्धव ठाकरे हे सरकार चापवण्यास पात्र नाही अशी टीका त्यांनी परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब वर बोलतांना केली आहे. महाविकासआघाडीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीची ही भुमिका ठाकरे सरकाच्या चिंतेत वाढ करणारी ठरणार आहे.