त्यासाठी पुन्हा ते वैभव टिकावे यासाठी काँग्रेसने कामाला लागावे :सत्यजित तांबे

8

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तांबे हे गुरूवारी प्रथमच सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी येथील रविंद्र मंगल कार्यालयात युवकांना मार्गदर्शन केले. आम्ही सावंतवाडीचा आदर्श घेत होतो, पण आता तो आदर्श दिसत नाही.त्यासाठी पुन्हा ते वैभव टिकावे यासाठी काँग्रेसने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

आपणास पुन्हा एकदा काँग्रेस उभी करायची आहे. त्यासाठी आजच्या युवकांतूनच उद्याचे नेतृत्व उभारी घेणार आहे. येथे अनेकांना पक्षाने ताकद दिली पण ते जाताना पक्षच सोबत घेउन गेले. त्यामुळे आपण थोडे कमी पडत असून, आता आपली राज्यात सत्ता आहे. त्यामुळे सर्व ताकद तुम्हाला देणार असून, काँग्रेसचा कोण अधिकारी ऐकत नसेल तर त्याला बांद्याहून चांद्याला पाठवण्याची जबाबदारी ही आमची आहे.असेही तांबे म्हणाले.

रेडी बंदराच्या कामावर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. रेडी बंदराचे काम ज्या उद्देशाने सरकारने संबधित ठेकेदाराला दिले होते. तसे काम होताना आता दिसत नाही. आमचेच बंदर विकासमंत्री आहेत. त्याच्याकडे मागणी करणार असून, संबधित ठेकेदारांकडून काम काढून घेण्यात यावे आणि ते काम दुसºयाला दिले जावे रेडी बंदराच्या नावावर पैसे कमवण्याचा धंंदा सुरू झाला आहे. पण प्रत्यक्षात काम केले जात नाही, असा आरोपही तांबे यांनी केला आहे.

काँग्रेसचा कोण अधिकारी ऐकत नसेल तर त्याला बांद्याहून चांद्याला पाठवण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यामुळे अधिकाºयांकडून कामे करून घ्या, पण ते सर्वसामान्य जनतेसाठी काम असावे, असे आवाहन तांबे यांंनी केले.

या कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, विभावरी सुकी उपस्थीत होते.