पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण हाताळण्यात येतं आहे त्यावर शरद पवार समाधान नाही आहेत. यावरुनच ते ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समजतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. तसंच अधिवेशन, कोरोनाचे संकट याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे संजय राठोड प्रकरणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी बोलून दाखवली.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर १५ दिवसांनंतर संजय राठोड मंगळवारी पहिल्यांदा माध्यमांसमोर आले.संजय राठोड प्रकरणी पहिल्यांदाच शरद पवार ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं सूत्रांकडून समजतंय.