यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वात आधी पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री

6

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. तसेच हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असेही ते म्हणाले.

तसेच विकास कामे करताना ती निसर्गाची जपणूक करून कशी केली जावीत, हे सांगणारी आणि यासाठीचा तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी, जिचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी, यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वात आधी पुढाकार घ्यावा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पहातो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते हे कोरोना विषाणुने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.