केंद्रामध्ये मजबुत विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी काही दिवसांअगोदर केले होते. संजय राऊतांच्या या विधानावरुन कॉंग्रेस नेते नाराज झाले होते. तसेच राऊतांना कॉंग्रेस नेत्यांच्या टीकेस सामोरसुद्धा जावे लागले होते.
दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा राऊतांवर टीका केली होती. “शिवसेना युपीएचा भाग नाही. त्यामुळे संजय राऊतांनी ऊगाच सल्ले देऊ नयेत, त्यांना युपीएबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही, संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की, शरद पवारांचे?”अशा कठोर शब्दांत नाना पटोलेंनी संजय राऊतांचा समाचार घेतला होजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रात एक मजबुत विरोधी पक्षाची आवश्यकता आहे, त्यामुळे मी ही ईच्छा व्यक्त केली होती. शरद पवार हे फार मोठे नेते आहेत, त्यांचे कार्यदेखील मोठे आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांना पद्मविभुषन देऊन सन्मानित केले आहेत. त्यामुळे काहींनी मला त्यांचा प्रवक्ता संबोधले याचा मला आनंदच आहे. असे संजय राऊत म्हणाले.
तसेच राहुल गांधी व सोनिया गांधींवर कुणी टिका केली तर त्याससुद्धा मी प्रत्युत्तर दिली आहेत. मग मी सोनिया गांधी किंवा राहुल गांधींचा झालो का? जेव्हा सोनिया गांधींवर टीका होते तेव्हा मी पहाडासारखा ऊभा राहिलो आहे, तेव्हा नाना पटोले कुठे होते? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.