महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेनेचे दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नुकतेच निवासस्थानावरुन प्रस्थान केले असल्याची माहिती मिळते आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार संजय राठोड थेट वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी याठिकाणी देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन आठवडण्यांपासून संजय राठोड हे कुणाच्याही संपर्कात नाही. बीड जिल्ह्यातील तरुणी, टीकटॉक स्टार पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणांत संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. आज संजय राठोड आपल्या निवास्थानाच्या बाहेर पडले आहेत. आज राठोड माध्यमांसमोर येतील अशी कुठलीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे आज संजय राठोड माध्यमांसमोर येणार की नाही हे अद्याल स्पष्ट झालेले नाही.
पुजा चव्हान या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर काही अॉडिअो क्लीप व्हायरल झाल्या होत्या. यावतुन विदर्भातील महाविकासआघाडीतील मंत्र्याचे नाव पुढे येत होते. पुजा चव्हान अात्महत्या प्रकरणावरुन राजकारणसुद्धा तापले होते. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांचे नाव घेत कारवाईची मागणी केली होती. भाजपने संजय राठोड यांचा राजीनामा आणि निष्पक्ष चौकशीची सातत्याने मागणी केली. परिणामी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामासुद्धा सोपवला होता. मात्र मुख्यमंत्र्यांकडून तो स्विकारण्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान संजय राठोड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न माध्यमांच्या प्रतिनिधींद्वारे करण्यात येत होता. परंतू ते नॉट रीचेबल येत होते. निवासस्थानावरसुद्धा ते ऊपस्थित नसल्याचे सांगण्यात येत होते. पुजा चव्हान अात्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतरसुद्धा संजय राठोड यांचे मौन त्यांच्यावर अधिक शंका वाढवत होते. मध्यंतरी त्यांनी माध्यमांसमोर येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो लगेच रद्द केला होता.
संजय राठोड बंजार समाजातील प्रतिष्ठीत नेते आहेत. महाराष्ट्रातील बंजारा समाजावर त्यांचे प्रभृत्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून जागोजागी समाज त्यांच्या पाठीशी ऊभा असल्याचे चित्र होते. पोहरादेवी बंजारा समाजासाठी काशी मानले जाते. त्यामुळे सर्वप्रथम ते पोहरादेवी याठिकाणी देवीचे दर्शन करणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कोरोनासंबंद्धीचा आढावा घेणार असल्याचेसुद्धा सांगण्यात येत आहे. यादरम्यान ते माध्यमांसमोर येतील का आणि आलेत तर काय स्पष्टीकरण देतील यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.